मुंबई- राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती २०० पेक्षा अधिक जागांवर जिंकत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या समाजमाध्यमावर पोस्ट लिहिली आहे. वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध जिंकले असे त्यांनी एक्सवर लिहिले आहे.
लोकसभा निवडणुकीत मुस्लीमांना महाविकास आघाडीला मतदान केल्याविरोधात किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला होता. विधानसभा निवडणुकीतही मालेगावमध्ये झालेल्या वोट जिहाद विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे महायुतीच्या विजयाने त्यांना आनंद झाला असून त्यांनी सकाळीच तातडीने आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.