शाळगावच्या खत कंपनीत वायु गळतीमुळे २ महिलांचा मृत्यू! ९ जणांची प्रकृती चिंताजनक

सांगली- रासायनिक खते तयार करणाऱ्या एका कंपनीत विषारी वायू गळतीमुळे दोन महिलेचा मृत्यू झाला.तर अन्य ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.कडेगाव तालुक्यात बोंबाळेवाडी- शाळगाव येथील एमआयडीसीतील मॅनमार कंपनीत काल गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता ही घटना घडली.

बोंबाळेवाडी एमआयडीसीमध्ये मॅनमार ही रासायनिक खते तयार करणारी कंपनी आहे.काल सायंकाळी येथील गळतीमुळे विषारी वायू एमआयडीसी परिसर आणि शेजारच्या वस्तीवर पसरला. यामुळे श्वास घेताना अडचण,डोळ्यात जळजळ आणि उलट्या होऊन गंभीर त्रास होऊ लागल्याने कंपनीतील चार कामगार व परिसरातील पाच नागरिक अशा ९ जणांना कराडच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.यातील ५ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.या घटनेत जवळच्या वस्तीवरील दोन महिलांचा मृत्यू झाला,तर अन्य नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.मृत महिलांची नावे सुचिता उथळे आणि नीलम रेठरेकर अशी आहेत. वायूगळतीमुळे कंपनीतील कर्मचार्‍यांसोबतच बोंबाळेवाडी,रायगाव आणि शाळगाव परिसरातील नागरिकांना त्रास झाल्याचे समजते.नागरिकांनी दक्षतेचा उपाय म्हणून मास्कचा वापर केला.या दुर्घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या दुर्घटनेची चौकशीची होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top