मुंबई – शेअर बाजारात आज मोठी घसरण नोंदविली गेली. अदानी समुहाच्या विरोधात अमेरिकेत लाचखोरीचा खटला दाखल होताच बाजारात खळबळ उडाली. बाजारात विक्री सुरु झाली . या घसरणीत बाजार साडेपाच महिन्यांच्या निचांकी पातळीवर बंद झाला.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४२२ अंकांनी घसरून ७७,१५५ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराजा निफ्टी १६८ अंकांनी घसरून २३,३४९ अंकांवर बंद झाला. तर बँक निफ्टी २५३ अंकांनी घसरून ५०, ३७२ अंकांवर बंद झाला.सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी २० कंपन्यांचे शेअर घसरले. तर १० कंपन्यांचे शेअर वधारले.निफ्टीमधील घसरणीमध्येही सुझलॉन एनर्जीसह ८२७ कंपन्यांचे शेअर तेजीत होते.
