नवी दिल्ली- केंद्र सरकारने भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) म्हणून आयएएस अधिकारी के. संजय मूर्ती यांची नियुक्ती केली आहे.भारताचे विद्यमान महालेखापाल गिरिश चंद्र मुर्मू यांचा कार्यकाळ आज २० नोव्हेंबर रोजी संपत आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये मुर्मू यांची देशाचे महालेखापाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.याआधी मुर्मू हे जम्मू-काश्मीरचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर होते. यानंतर आता के.संजय मूर्ती हे त्यांचा पदभार स्विकारणार आहेत.के. संजय मूर्ती हे सध्या शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव आहेत. संजय मूर्ती हे हिमाचल प्रदेश केडरचे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.मूर्ती हे लवकरच ‘कॅग ‘ म्हणून आपला पदभार ग्रहण करणार आहेत.