चंदीगढ – हवामानातील बदलामुळे कालपासून संपूर्ण पंजाब राज्यच धुक्यात गुरफटले असून त्याचा परिणाम विमान व रेल्वे वाहतूकीवर पडला आहे. पंजाबच्या विविध शहरात जाणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत. रेल्वेचा वेगही मंदावल्यामुळे त्यांनाही विलंब होत आहे.रेल्वे गाड्या केवळ ५० किलोमीटर प्रतितास तर मालगाड्या ३० किलोमीटर प्रतितास वेगाने चालवण्याच्या सूचना रेल्वेने दिल्या. अनेक रेल्वे गाड्या या फॉग सेफ्टी डिवाईसच्या मदतीने चालवण्यात आल्या. अमृतसर विमानतळावरील अनेक विमाने रद्द् करण्यात आली. हवामान विभागाने पंजाबमध्ये धुक्याचा यलो अलर्ट जारी केला. पंजाबच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली असून त्यानंतर थंडीत वाढ होणार आहे.
