जळगाव- शिंदे गटाचे नेते आणि अभिनेता गोविंदा आज महायुतीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. यावेळी पाचोऱ्यामध्ये रोड शो सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले तसेच गोविंदा यांच्या ज्या पायाला गोळी लागली होती, तो पाय देखील दुखत असल्याने त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले.यावेळी ते म्हणाले की, माझी तब्येत ठीक नसल्याने मी इथून निघत आहे. मी इथल्या जनतेची माफी मागतो. इथल्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. माझी तब्येत ठीक नाही. मला गोळी लागलेली होती आणि आता सध्या छातीमध्येदेखील दुखत आहे. जोखीम नको म्हणून मी आता हा दौरा अर्धवट सोडून पुन्हा मुंबईला जात आहे.
