पाकिस्तानवरही तिरंगा फडकेल फडणवीस यांचा ‘महाआशावाद’

मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राचकीय वर्तुळात मोठा वादंग उठला आहे. भाजपाचेच काही नेते या घोषणेपासून दूर पळत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या घोषणेचे समर्थन केले. बटेंगे तो कटेंगे हा या देशाचा इतिहास आहे. आपण जर एकजुटीने राहिलो तर काश्मीरच काय पाकिस्तानवरही तिरंगा फडकवू शकतो, असा महाआशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला.
बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरून विरोधकांनी भाजपाला धारेवर धरले आहे.तर भाजरपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे यांनी या घोषणेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न केला. भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी तर सुरुवातीपासून या घोषणेला उघड विरोध केला. अशा प्रकारच्या घोषणा उत्तर प्रदेशमध्ये चालत असतील, पण महाराष्ट्रातील जनतेला ते मुळीच रुचणार नाही,अशी रोखठोक भूमिका अजित पवार यांनी प्रचारसभांमधून वारंवार मांडली.
या पार्श्वभूमिवर देवेद्र फडणवीस यांना या घोषणेबद्दल छेडण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांनी घोषणेचे समर्थन करण्याचा जोरदार प्रयत्न केला.’ हिंदू एकजुटीने राहिले नाहीत तर काय होते हे फाळणीने आपल्याला दाखवून दिले आहे. त्यामुळे हिंदूंच्या एकजुटीसाठी अशा प्रकारची घोषणा देणे यात काहीही गैर नाही. त्याहीपुढे जाऊन मी म्हणेन की हिंदूंची जर एकजूट झाली तर आपण काश्मीरच नव्हे तर पाकिस्तानचा पराभव करून तिथेही आपला तिरंगा फडकवू शकू’.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top