एससी-एसटीचे आरक्षण वाढवणार झारंखडमध्ये राहुल गांधींची घोषणा

सिमडेगा – झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ४३ जागांसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज ख्रिश्चनबहुल सिमडेगा येथील गांधी मैदानावर पहिली जाहीर सभा घेतली. आम्ही एससी-एसटीचे आरक्षण वाढवणार आहोत. त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क मिळतील. तुम्हाला १५ लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळेल. प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला सात किलो रेशन देण्यात येणार आहे. तरुणांसाठी प्रत्येक जिल्ह्यांत शाळा आणि महाविद्यालये उभारणार आहोत. दहा लाख तरुणांना रोजगार देणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी या सभेतून केली.राहूल गांधी म्हणाले की, हे अदानी-अंबानींचे सरकार आहे. हे सरकार फक्त त्यांच्या फायद्यासाठी काम करते. आमची योजना फक्त गरीब लोकांबद्दल बोलते. देशात सुमारे ५० टक्के ओबीसी, १५ टक्के दलित, ८ टक्के आदिवासी आणि १५ टक्के अल्पसंख्याक समाजाचे लोक आहेत. त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ९० टक्के आहे. देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात ओबीसी, दलित आणि आदिवासी वर्गातील व्यक्ती तुम्हाला सापडणार नाहीत. भारत सरकार ९० अधिकाऱ्यांद्वारे चालवले जाते, हे अधिकारी देशाच्या संपूर्ण बजेटचे निर्णय घेतात. यापैकी एखादा अधिकारी आदिवासी प्रवर्गातील असेल. तो सरकारच्या १०० रुपयांपैकी तो १० पैशांचा निर्णय घेऊ शकतो.राहुल गांधी म्हणाले की, आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो आणि भाजपाचे लोक तुम्हाला वनवासी म्हणतात. आदिवासी म्हणजे या देशाचे, पृथ्वीचे पहिले रहिवासी. जल, जंगल आणि जमीन यावर त्यांचा हक्क आहे. वनवासी असणे म्हणजे जल, जंगल आणि जमिनीवर तुमचा अधिकार नाही. तुम्ही जंगलात राहता त्यामुळे तुम्हाला कोणताही अधिकार मिळणार नाही. तुम्ही शिक्षण घेऊ नये, तुमची मुले डॉक्ट, इंजिनीयर बनूल नयेत, अशी त्यांची इच्छा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top