मुंबई : पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालघरसह संपर्कप्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भारती कामडी यांचा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून भारती कामडी यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. सावरा यांना पालघर लोकसभा निवडणुकीत ६ लाख १ हजार २४४ मते मिळाली. तर कामडी यांना ४ लाख १७ हजार ९३८ मते मिळवली होती.