सिएटल – जागतिक स्तरावरील आघाडीची विमान उत्पादक कंपनी असलेल्या बोईंगने आपल्या कर्मचाऱ्यांना ३८ टक्के पगारवाढ दिली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ७ आठवडे चाललेला संप अखेर मागे घेतला आहे. ही पगारवाढ येत्या ४ वर्षांसाठी असून हा नवा प्रस्ताव स्विकारण्याच्या बाजूने ५९ टक्के कर्मचाऱ्यांनी मत दिले आहे.बोईंग कंपनीच्या सिएटल येथील वेस्ट कोस्ट येथील कारखान्यात गेल्या ७ आठवड्यांपासून पगारवाढीसाठी संप सुरु होता. कंपनीकडून या आधीही पगारवाढीचे दोन पर्याय देण्यात आले होते. मात्र कामगारांनी ते फेटाळले होते. अखेर काल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केली ऑर्टबर्ग यांनी हा नवा प्रस्ताव दिला. या कंपनीतील कामगार संघटनेने १६ वर्षात पहिल्यांदाच हा संप केला होता. संपकाळात बोईंगच्या विमान निर्मितीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे देशविदेशातील अनेक विमानकंपन्यांनाही त्याचा आर्थिक फटका पडला होता. जागतिक हवाई उड्डाण क्षेत्राचेही आर्थिक नुकसान झाले होते. हा संप मिटल्याने या साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे. कामगारांच्या संघटनेने सर्व कामगारांना कामावर परत येण्याचे निर्देश दिले आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |