कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरीत २४ तास विठ्ठल दर्शन सुरू

सोलापूर – आषाढी आणि कार्तिकी या दोन वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी येतात. या वारीच्या कालावधीत जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन व्हावे यासाठी आजपासून विठ्ठल मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले असणार आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत देवाची निद्रा बंद होत असल्याने परंपरेप्रमाणे देवाचा पलंग आज काढला जाणार आहे. याचाच अर्थ विठुरायाचे आजपासून २४ तास दर्शन घेता येईल. चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्रींचा पलंग काढण्याची परंपरा आहे. यावर्षी कार्तिकी साठी आजचा दिवस चांगला असल्याने विधिवत पुजा करून सकाळी श्रींचा पलंग काढण्यात आला अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.