मुंबई – मागील काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत तर देशातील विविध विमान कंपन्यांना आलेल्या धमक्यांची संख्या १०० पेक्षा जास्त अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विमानात बॉम्ब असल्याच्या
धमक्यांमुळे या विमानांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यानंतर निर्धारित नियमांनुसार त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासणीदरम्यान या विमानांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. यामुळे या विमानांना किमान तीन ते चार तास विलंब झाला आणि याचा फटका प्रवाशांना बसला. धमकी आलेल्या विमानांमध्ये एअर इंडिया कंपनीच्या ३६, विस्ताराच्या ३५ आणि इंडिगो कंपनीच्या ३२ विमानांचा समावेश आहे. दरम्यान,गेल्या १६ दिवसांत ५१० विमानांना धमकी आली होती.