अहमदनगर – अहमदनगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी पिकअपने दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले असून एका महिलेसह अन्य तिघे जखमी झाले आहेत.नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर राहुरी खुर्द गावाच्या हद्दीत आज सकाळी अकरा वाजता एक टेम्पो भरधाव वेगाने जात होता. यावेळी टेम्पोचे नियंत्रण सुटून तो दुचाकीवरील दोघांवर आदळला. त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. या वाहनाने दुसऱ्या एका दुचाकीला धडक दिली असता त्यावरील महिला खाली पडून जखमी झाली असून या अपघातात रस्त्यावर चालणारे इतर तिघेजणही जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावेळी तिथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
