कम्पाला – युगांडाच्या न्यायालयाने लॉर्ड्स रेझिस्टन्स आर्मीच्या माजी कमांडर थॉमस क्वोयेलोला ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हल्ला करणे, हत्या, बलात्कार, अपहरण आणि दरोड्यासह ४४ प्रकरणांत त्याला दोषी ठरवले. मात्र त्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.गेल्या १५ वर्षांपासून तो जेलमध्ये आहे. त्यामुळे त्याला आता २५ वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. क्वोयेलो लॉर्ड्स रेझिस्टन्स आर्मीचा पहिला कमांडर होता. १९८०मध्ये स्थापन झालेल्या लॉर्ड्स रेझिस्टन्स आर्मीवर युगांडा आणि शेजारील देशांमध्ये लोकांवर अत्याचारांसह अनेक गंभीर गुन्हे केल्याचा आरोप आहे. लॉर्ड्स रेझिस्टन्स आर्मीने २००४ मध्ये उत्तर युगांडातील पागाक येथे विस्थापित लोकांच्या छावणीवर हल्ला केला होता. त्यात महिला आणि मुलांना लाकडीने मारहाण केली होती. त्यावेळी तेथील परिस्थिती बिघडली होती.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |