रायपूर – छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यात एकाच वेळी तीन हत्तींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागात खळबळ उडाली आहे.रायगड घरघोडा वनपरिक्षेत्रातील चुहकीमार जंगलात तुटलेल्या विजेच्या ११ केव्ही लाईनच्या वायरला स्पर्श झाल्याने एका पिल्लासह तीन हत्तींचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच रायगड वनविभाग स्टायलो मांडवीचे वन अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.जंगलात अनेक ठिकाणी कुंपणांत वीज प्रवाह सोडलेला असतो. वास्तविक अशा प्रकारे विजेचा प्रवाह सोडण्यास बंदी असतानाही हे कृत्य केले जाते .गेल्या सहा वर्षांत छत्तीसगडमध्ये ७० हून अधिक हत्तींचा अशा तऱ्हेने मृत्यू झाला आहे. हत्तींचे कळप हे अन्नाचा शोध घेत मानवी वस्तीकडे जाताना दिसत आहेत.यातूनच मानव आणि हत्तींमधील संघर्ष वाढत चालला आहे.