राहुल गांधींनी छोट्या दुकानात दाढी केली ! गप्पा मारल्या

नवी दिल्ली – लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील एका छोट्या दुकानात जाऊन दाढी करून घेतली. नाभिकाशी गप्पाही मारल्या . हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर खासदार पोस्ट केला. या व्हिडिओत राहुल गांधी हे नाभिक अजित याच्याशी गप्पा मारत त्याचा व्यवसाय , अडचणी , कुटुंब याबद्दल चौकशी करताना दिसतात . नाभिक अजित यांचाच ‘कुछ नहीं बचता है! ‘ हा डायलाॅग लिहित पुढे म्हटले आहे की अजित भाई यांचे चार शब्द आणि त्यांचे अश्रू ही आजच्या भारतातील प्रत्येक मेहनती गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्तीची व्यथा सांगते. नाभिक असे, चर्मकार असो किंवा कुंभार असे त्यांची घटणारी कमाई आणि वाढणारी महागाई यामुळे त्यांचे सर्वस्व लुटले जाते , त्यांचे स्वप्न भंग होते. आज आधुनिक उपाय आणि नव्या योजनांची आवश्यकता आहे ज्यामुळे लोकांची कमाई आणि बचत होईल . असा समाज निर्माण होईल जेथे कौशल्य आणि मेहनतीचे प्रत्येक पाऊल तुमच्या यशाची पायरी चढण्यास सहाय्यभूत ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top