अमरावती – राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके खळ्यात किंवा शेतातच पडून राहिल्याने त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड भोगावा लागला आहे. राज्यातील भात, नाचणी, सोयाबीन, कापूस व तुरीला या पावसाचा मोठा फटका बसला आहे.अमरावती जिल्ह्यातील पावसाने शेतात असलेल्या सोयाबिनला फटका बसला आहे. पावसाच्या भितीने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरी आणले आहे. मात्र शेतातील सोयाबीन खराब झाले आहे. तुरीला आलेल्या फुलोऱ्यालाही या पावसाचा मोठा फटका बसला. अमरावतीत तिवसा तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे संत्रा बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. याच्या १० दरवाज्यातून १६ हजार ७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील पावसामुळे शेतात पाणी साचले असून कापून ठेवलेल्या धान पिकाचे नुकसान झाला .नांदेड जिल्ह्यातही अतिवृष्टीची नोंद झाली .वाशिम, मालेगाव, कल्याण, मुरबाड, नांदेड, जालना या भागातील शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाने भात व नागलीचे नुकसान केले .
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |