मुंबई – ठाणे स्थानकाच्या पुढे धिम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे.१५ डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढल्यास दररोज सुमारे सव्वा दोन लाख अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यामुळे ठाणे स्थानकापुढील प्रवाशांना गर्दीच्या वेळी फार मोठा दिलासा लाभणार आहे.मुख्य मार्गावरील उपनगरीय रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढविण्याासाठी मध्य रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची योजना रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे.त्याअंतर्गत ठाण्यापलीकडील सर्व स्थानकांवरील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस या मार्गावर १५ डब्यांच्या गाड्या धावतील,अशी अपेक्षा आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |