सिल्लोड – छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मधील एका गावात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पूर्णा नदीत बाप लेक बुडाल्याची घटना घडला. बराच वेळ शोध घेऊनही ते सापडले नाहीत. त्यामुळे नदीच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र त्यांचे मृतदेह सापडलेले नाहीत.
सिल्लोडच्या वांजोला भागात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सांडू नामदेव सागरे व निवृ्त्ती सांडू संगरे हे बापलेक गेले होते. मात्र विसर्जनाच्या वेळी त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही . त्यामुळे ते बुडाले. यावेळी विसर्जनासाठी आलेल्या काही लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. हे दोन्ही बाप-लेक नदीच्या पाण्यात बुडून बेपता झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही पथकांनी नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली.