स्कूल व्हॅनमध्ये ‘महिला सहाय्यक’नेमण्याची जबरदस्ती करू नका

पुणे- ‘सेव्हन प्लस वन’ इतकी क्षमता असलेल्या स्कूल व्हॅनमध्ये महिला सहायक असाव्यात, यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी जबरदस्ती करू नये,अशी मागणी पुण्यातील शालेय वाहतूक संघटनांनी केली.

एका चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभाग कारवाईच्या पवित्र्यात आहे. शालेय वाहतुकीच्या वाहनांवर धडक कारवाई केली जात आहे.शालेय वाहनामध्ये नियमांचे पालन झाल्याचे दिसले नाही, तर तत्काळ दंडात्मक, जप्तीची कारवाई केली जात आहे. आरटीओकडून या कारवाईत काही स्कूल व्हॅनचालकांवरदेखील महिला सहायक नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शालेय वाहतुकीच्या २०११ च्या नियमानुसार १२ पेक्षा अधिक विद्यार्थी क्षमता असेल, तरच महिला सहाय्यक बंधनकारक आहे. मात्र, स्कूल व्हॅनची क्षमता १२ च्या आतच असते, त्यामुळे आरटीओकडून होत असलेली ही कारवाई अन्यायकारक आहे, अशा भावना शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top