मुंबई- काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हा परतीचा पाऊस येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात पडणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जम्मू आणि काश्मीर, लडाख-गिलगीट- बाल्टीस्तान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि राजस्थानमधून पाऊस माघारी परतला आहे.
