अहंकार सोडा, जनतेची कामे करा! मालिवाल यांचा ‘आप’ला घरचा आहेर

नवी दिल्ली – हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या नेत्या खासदार स्वाती मालिवाल यांनी एक्स पोस्ट करून पक्षावर निशाणा साधला.अहंकार सोडा, जनतेची कामे करा,असा घरचा आहेर मालिवाल यांनी ‘आप’ला दिला.

केवळ काँग्रेसवर सूड उगवण्यासाठी तुम्ही हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत उतरलात. माझ्यावर भाजपाची एजंट असल्याचा आरोप केला. स्वतः मात्र इंडिया आघाडीशी गद्दारी करून काँग्रेसची मते खाल्ली.बाकी सर्व सोडा, तुम्ही विनेश फोगटला पराभूत करण्यासाठी उमेदवार दिला.पण तुम्हाला हरियाणात भोपळाही फोडता आला नाही.
तुमच्यावर अशी परिस्थिती का ओढवली की तुमचे उमेदवार आपल्याच राज्यात डिपॉझीटही वाचवू शकले नाहीत.अजून वेळ गेलेली नाही. अहंकार सोडा, डोळ्यावरची झापडे दूर करा. ड्रामेबाजी करू नका. जनतेची कामे करा, अशी खरमरीत टीका मालिवाल यांनी एक्स पोस्टमध्ये केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top