मुंबई- मध्य रेल्वे मुंबईतील मुख्य मार्गावर धावणार्या १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढविणार आहे. त्यासाठी ठाणे ते कल्याण दरम्यानच्या स्थानकातील फलाटांचा विस्तारा करण्याचे काम सुरू आहे.
सध्या मध्य रेल्वे मार्गावर ठाण्याच्या पुढे डोंबिवली व कल्याण येथेच जलद मार्गावर १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक लांबीचे फलाट आहेत.मात्र या दरम्यानच्या स्थानकांवर देखील धीम्या मार्गावर फलाटांची लांबी वाढविण्याचे म्हणजेच विस्तार करण्याचे काम सुरू आहे.तसेच सध्या मुख्य मार्गावर १५ डब्यांच्या २२ फेर्या चालविल्या जातात. या लोकल फेर्या वाढविण्याची मध्य रेल्वेची योजना आहे.त्यामुळे आता ठाण्याच्या पुढेही १५ डब्यांच्या लोकल थांबू शकणार आहेत.