चंद्रपूर – मागील तीन वर्षे चंद्रपुरात उच्छाद मांडलेल्या एका वाघिणीला पिंजर्यात जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. आहे.या वाघिणीने ३ वर्षात ११ जणांचा बळी घेतला आहे. दहशत माजविणाऱ्या या वाघिणीला जेरबंद केल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे आहे.
वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितले की, टी- ८३ म्हणून ओळखल्या जाणार्या या वाघिणीला सकाळी जनाला परिसरातील कंपार्टमेंट क्रमांक ७१७ मधून बेशुद्ध करून पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. ही वाघीण गेल्या ३ वर्षांपासून मोकाट फिरत होती.तिला अनेकदा पकडण्याचा प्रयत्न करूनही पिंजर्यात पकडली गेली नव्हती.मात्र यावेळी वनविभागाच्या पथकाने तिला जेरबंद करण्याची पुरेपूर तयारी होती.या पथकात पशुवैद्यक आणि अनुभवी कर्मचार्यांचा देखील समावेश होता.आधी या वाघिणीला पकडण्यासाठी तिला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिले आणि नंतर पिंजऱ्यात बंद केले.तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर या धोकादायक वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळाले ही मोठी दिलासादायक बाब असल्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे वरिष्ठ वन अधिकारी यांनी म्हटले आहे.