राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंची सियाचीन तळाला भेट

लेह – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज सियाचीन या जगातील सर्वाधिक उंचीवरच्या सैन्य तळावर जाऊन तेथील सैनिकांशी संवाद साधला. त्यांनी बेसकॅपचा दौरा केला व सैनिकांची विचारपूस केली.सियाचीन दौऱ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे आज सकाळी लेह विमानतळावर आगमन झाले. नायब राज्यपाल बी.डी. शर्मा यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्या सियाचीन बेस कॅंपसाठी रवाना झाल्या. त्या ठिकाणी सैनिकांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींनीही त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. या आधी सियाचीन बेस कँपवर केवळ माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम व रामनाथ कोविंद या दोन राष्ट्रपतींनीच भेट दिली होती.