मुंबई – महायुतीमध्ये नेमका सिंघम कोण, फडणवीस की शिंदे हे आधी ठरवा,असा टोला अक्षय शिंदे एन्काउंटरच्या मुद्यावरून हाणला.बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी चकमकीत ठार केले. त्याचे श्रेय घेण्यासाठी महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे.
फडणवीस यांच्या समर्थकांनी हातात रिव्हॉल्व्हर घेतलेला फोटो असलेले बॅनर काल मुंबईभर झळकले.बदला पुरा असे या बॅनरवर लिहिले होते. तर शिंदेसमर्थकांनी एक नाथ,एक न्याय, बलात्काराला माफी नाय, असे बॅनर लावून एन्काउंटरचे श्रेय शिंदे यांना दिले. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला.अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करून कोणता बदला पुरा झाला, कोणी पुरा केला हे जनतेला सांगा.महायुतीत शिंदे कोण हे कॅबिनेट बैठक घेऊन ठरवा,असे राऊत म्हणाले.