परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई – परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक असते. ही परीक्षा येत्या डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.या परीक्षेसाठी भारतीय आयुर्विज्ञान आयोगाने जारी केलेले पात्रता प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक असते.आयोगाने या प्रमाणपत्रासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.