अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाचे नावही अहिल्यानगर करण्याला आपली हरकत नाही असे पत्र भारतीय रेल्वेने दिले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी ही माहिती दिली आहे.गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी या ठिकाणी झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात या नामांतराची घोषणा केली होती. तसा ठराव अहमदनगर महानगरपालिकेतही मांडण्यात आला. प्रशासकांकडून त्याला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर अहमदनगर स्थानकाचे नाव अहिल्यानगर करण्यासंदर्भात भारतीय रेल्वेला पाठवलेल्या अर्जाचे उत्तर आले असून रेल्वेने आपली हरकत नसल्याचे म्हटले आहे. अहिल्यानगर नावाचे इतर कोणतेही रेल्वेस्थानक देशात नाही. त्यामुळे या नावाला हरकत नाही. असे रेल्वेने म्हटले असून नाव बदलण्याच्या संदर्भातील हा पहिला व महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अहमदनगर रेल्वेस्थानकाचे नावही अहिल्यानगर असे होण्याची शक्यता आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |