पालेभाज्यांच्या दरातविक्रमी वाढ

नाशिक -गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे दर वधारले असून 20 ते 30 रुपयांना मिळणारी कोथिंबीर जुडी दोनशे रुपयांहून जास्त किमतीने विकली जात आहे. नाशिकच्या बाजारात गावठी कोथिंबीर 450 रुपयाला, तर मेथी 250 रुपयाला जुडी विकली जात आहे. कोथंबिरीच्या जुडीला सरासरी २०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कोथिंबीरीसह इतरही पालेभाज्यांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. याचा परिणाम पालेभाज्यांवर झाला. जास्त पावसामुळे कोथिंबीराच्या पिकाचं नुकसान झाले. पालेभाज्यांची आवक घटल्याने दर वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.