इचलकरंजी- गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी महापालिकेच्या वाहन विभागाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे.या इमारतीच्या छताला तडे गेले असून स्लॅबला गळती लागली आहे.पालिकेने याची वेळीच दखल घेतली नाही तर या विभागाची महत्वाची कागदपत्रे खराब होण्याची शक्यता आहे.
या महापालिकेचा वाहन विभाग महत्वाचा घटक आहे.तरीही पालिका प्रशासनाने या विभागाच्या झालेल्या दयनीय अवस्थेकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही.या इमारतीच्या छताला तडे आणि स्लॅबला गळती लागली आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे भिंतीतून पाणीही पाझरू लागले आहे.त्यामुळे कर्मचारी या इमारत कार्यालयात काम करताना भीतीच्या छायेखाली वावरताना दिसत आहेत.