तेहरान – इराणची १५ वर्षीय पॅरा-तायक्वाोंदो अॅथलीट झाहरा रहिमी हिने पॅरीस पॅरालिम्पिक-२०२४ सर्धेत रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात इराणच्या महिला अॅथलीटने मिळविलेले हे पहिले रौप्य पदक आहे.
५२ किलो वजनी गटात अंतिम फेरीत झाहराचा सामना मंगोलियाची अॅथलीट एस उलंबयार हिच्याशी झाला. त्यात झाहराचा ५-२ असा पराभव झाला. तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.याआधीच्या लढतीत झाहराने चिनच्या शाओ जियान हिचा पराभव केला होता. झाहराने मिळविलेले रौप्य पदक हे या स्पर्धेतीलही इराणने मिळविलेले पहिले रौप्य पदक आहे.