*४२५ झोपडीधारकांना
पर्यायी घरेही देणार !
मुंबई- दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जमीन मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आहे.आता त्याठिकाणी मुंबई सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे.त्यासाठी या जागेतील ६५० पैकी २५ टक्के तबेले हटविले जाणार आहे. या तबेल्यांच्या पुनर्वसनासाठी महापालिका रॉयल क्लबला १०० कोटी रुपये भरपाई म्हणून देणार आहे.मात्र ही आर्थिक भरपाई देण्यास नागरिकांचा विरोध आहे.
मुंबई सेंट्रल पार्कच्या बांधकामासाठी नुकत्याच पालिकेच्या ताब्यात गेलेल्या जागेत घोड्यांचे ६५० तबेले आहेत.त्यापैकी २५ टक्के म्हणजे १६० तबेले बाधित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी पालिकेने १०० कोटी रुपये द्यावेत अशी मागणी रॉयल क्लबने केली होती.ही मागणी पालिकेने मान्य केली आहे. ही रक्कम लवकरच रॉयल क्लबला दिली जाईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे पालिकेच्या या भूखंडाजवळ असलेल्या ४२५ झोपड्या देखील हटविल्या जाणार आहेत. या झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पर्यायी घरे दिली जाणार आहेत. त्यासाठी सल्लागार नेमला जाईल.