मुंबई- मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई कोस्टल रोड अर्थात मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाची डेडलाईन चुकली असून अद्यापही काम पूर्ण केव्हा होईल याची नवीन डेडलाईन दिली गेलेली नाही. दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर फक्त ३५ कोटींचा दंड आकारल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पालिकेने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेकडे मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाची माहिती विचारली होती.यासंदर्भात मुंबई किनारा रस्ता प्रकल्प विभागाने अनिल गलगली यांना कळविले की, मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे काम ३ भागामध्ये विभागले आहे. भाग १ अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस पर्यंतचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो याना दिले असून आतापर्यंत या कामात ११.६३ कोटींचा दंड आकारला आहे. त्याचप्रमाणे भाग २ अंतर्गत बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे काम मेसर्स एचसीसी- एचडीसीला दिले असून या कामात १६.१३ कोटींचा दंड आकारला आहे. भाग ४ अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क पर्यंतचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो यास दिले असून आतापर्यंत या कामात ७.२५ कोटींचा दंड आकारला आहे. आजतागायत ९१ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.लार्सन अँड टूर्बो तर्फे २३ जुलै २०२४ रोजी लेखी पत्र पाठवून १८१ दिवसाची मुदतवाढ मागितली आहे.यात ८ कारणे सांगत मुदतवाढ मागितली आहे.