लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज करताना’नारीशक्ती’चा सर्व्हर डाऊन

मुंबई -राज्य सरकारने “मुख्यमंत्री लाडकी बहीण” या योजनेची घोषणा केली. या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. अंगणवाडी सेविका, शासकीय सेवा केंद्र तसेच ऑनलाईन नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. परंतु मागील चार दिवसापासून नारीशक्ती सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अर्ज दाखल करताना महिलांना अनेक अडचणी येत आहेत. अर्जासाठी रात्री उशिरा जागावे लागते.

दरम्यान, या योजनेचे सुरुवात झाल्यापासून राज्यभरामध्ये भरपूर याला प्रतिसाद मिळत आहे. महिनाभरात या योजनेचे जवळपास दीड कोटी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र, मागील तीन-चार दिवसांपासून नारीशक्ती दूत या ऑनलाइन ॲपचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अर्ज दाखल करता येत नाही. दिवसभर अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळे रात्री 11 नंतर ॲप व्यवस्थित चालते. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना दिलेली कागदपत्रे आणि 11 वाजल्यानंतर मोबाईलवर येणारा ओटीपी देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत महिलांना जागावे लागत आहे. तरीसुद्धा सर्व्हर डाऊन असल्यामुळे अर्ज भरतेवेळी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
अर्ज भरताना पुढची स्टेप जात नाही. सुरुवातीला वाटले की नेटवर्क नसल्यामुळे असे होत असेल. परंतु विचारणा केली आणि माहिती मिळाल्यानंतर नारीशक्ती दूत ॲपचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे अर्ज पुढे सरकत नसल्यामुळे माझ्याकडे कित्येक अरज पडून आहेत, अशी प्रतिक्रिया अंगणवाडी सेविका कर्मचारी दिगंबर लोहार यांनी “नवाकाळ शी बोलताना दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top