दिल्लीतील कोचिंग सेंटरदुर्घटनेचा तपास सीबीआयकडे

नवी दिल्ली- २६ जुलै रोजी दिल्लीतील कोचिंग सेंटर मध्ये झालेल्या दुर्घटनेचा तपास दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. आज सुनावणीत पोलिसांना धारेवर धरत न्यायालयाने म्हटले की अशा दुर्घटनांमध्ये कोणावरही गुन्हा कसा दाखल करता? उद्या तळघरात घुसलेल्या पाण्यावरही दंड आकाराल का ?

२६ जुलै रोजी दिल्लीच्या राजेंद्र नगर मध्ये एका इमारतीच्या तळघरातील कोचिंग क्लासमध्ये पाणी शिरून तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे .त्यावर आज दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी पोलिसांच्या तपासाबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली . ज्या इमारतीत दुर्घटना घडली त्या इमारतीच्या प्लॅनला कोणी परवानगी दिली होती? या प्रश्नावर चौकशी सुरु आहे असे उत्तर पोलिसांनी देताच न्यामूर्ती संतापले . तुम्ही पोलीस आहात, तुमच्याकडे अधिकार आहेत. मग अजूनही तुम्हाला ही माहिती कशी नाही मिळाली असा सवाल न्यायालयाने केला. या प्रकरणी रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यातून गाडी नेणाऱ्या ड्रायव्हरला तुम्ही कसे काय जबाबदार धरू शकता ? तुम्ही या प्रकरणाचा तपास व्यवस्थित केलेला नाही असा ठपका ठेवून न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top