पॅरिस ऑलिंपिकसाठी पी.टी.उषा यांची घोषणा
नवी दिल्ली- आगामी पॅरिस
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताची ऑलिंपिक कांस्यपदक विजेती पी.व्ही.
सिंधू ही भारताची ध्वजवाहक असणार आहे. तर ऑलिंपिक ब्राँझपदक विजेते नेमबाज गगन नारंग यांची भारतीय पथकाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी.उषा यांनी केली.
मेरी कोम हिने भारतीय पथकप्रमुख पदावरून माघार घेतली होती. तिच्याऐवजी एका व्यक्तीची निवड करावयाची होती. पी. टी.उषा याप्रसंगी म्हणाल्या की,मेरी कोमने माघार घेतल्यानंतर ती जागा रिक्त झाली होती.भारतीय पथकप्रमुखपदासाठी ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूच्या नावाला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे गगन नारंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.पुरुष ध्वजवाहक म्हणून टेबलटेनिसपटू शरथ कमल याच्या नावावर मार्च महिन्यातच शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पण महिला ध्वजवाहकाची निवड करणे बाकी होते. अखेर पी. व्ही.सिंधू हिच्या नावावर मोहर उमटवण्यात आली. सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी एकमेव महिला खेळाडू म्हणून तिची निवड करण्यात आली, असे पी.टी.उषा म्हणाल्या.