मुंबई- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै- ऑगस्टमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणार्या परिक्षेचे हॉल तिकीट उद्या गुरुवार ४ जुलैपासून मिळणार आहे.
माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी परिक्षेच्या हॉल तिकिटाची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांची बोर्डातर्फे जुलै- ऑगस्ट महिन्यात अनुत्तीर्ण झालेल्या विषयांची पुन्हा परीक्षा घेतली जाते. त्या परिक्षांचे हॉल तिकीट वाटप उद्यापासून होणार आहे. हॉल तिकीट विद्यार्थ्यांकडून हरविल्यास संबंधित शाळा किंवा महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘ द्वितीय प्रत ‘ म्हणजे डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना द्यायची आहे.