मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनेत चिंताजनक वाढ

मुंबई
मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनेत चिंताजनक वाढ असून 2020 ते 2023 या कालावधीत तब्बल 3508 कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार वधगृहाच्या कार्यालयातून माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) मिळवलेल्या आकडेवारीतून मिळालेल्या माहितीनुसार, 2020 ते 2023 या कालावधीत तब्बल 3508 कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत ज्यात पाळीव कुत्र्याची एक घटना आहे. उर्वरित घटनांना भटके कुत्रे जबाबदार आहेत.
तीन वर्षांच्या कालावधीत महानगरपालिकेद्वारे पाळीव कुत्र्यांसाठी परवाने देण्यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. या कालावधीत एकूण 19,158 परवाने जारी करण्यात आले. 2020 मधील 2581 परवान्यांवरून 2022 मध्ये 6605 परवाने इतकी वाढ दर्शविते.
महानगरपालिकेचे नसबंदीच्या योजनेकडे दुर्लक्ष तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये रात्रीच्या वेळी कुत्र्यांना खायला घालण्याच्या प्रमाणात दुप्पट वाढ झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येत अनियंत्रित वाढ झाल्यामुळे रहिवाशांवर हल्ले होण्याचा धोका वाढतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top