नांदगाव तालुक्यात ढगफुटी कोवळी पिके आली धोक्यात

नाशिक- नांदगाव तालुक्याच्या.काही भागात नुकताच ढगफुटीसदृश्य पाऊस पडला.या पावसाने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. आठ दिवसांत दुसर्‍यांदा असा मुसळधार पाऊस कोसळल्याने पंधरा दिवसांचे कोवळे खरीप पिक धोक्यात आले आहे.

नांदगावच्या दक्षिण परिसरात सारताळे, जामदरी,मुळडोंगरी, कळमदरी, मळगाव, आमोदे, बोराळे येथे मुसळधार पाऊस कोसळला.या अतिपावसामुळे पिके धोक्यात आली आहेत.तर तालुक्याच्या काही भागात अजून पावसाचा थेंबही नाही. याठिकाणी शेतीतील ढेकूळही फुटलेले नाही.११ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने साकोरा परिसराला जीवदान ठरणारा मोरखडी बंधारा ५० टक्के भरला होता.तेव्हा साकोरा परिसरातील पाण्याचा प्रश्‍न थोडा सुटला होता. त्यानंतर एक महिन्याने ११ जून रोजी पाऊस बरसल्याने पेरणी झाली.१७ जून रोजी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आणि परत अवघ्या आठ दिवसांनी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. शेतातील बांध,नाला बल्डिंग, बंधारे ओसंडून वाहायला लागले. अर्धा तास साकोरा-वेहेळगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top