सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

बारामती
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून हे दोन्ही उमेदवार गुरुवारी १८ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यादिवशी दोन्ही बाजूने जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह पुण्याचे मुरलीधर मोहोळ आणि आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या निमित्त महायुती शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यादिवशी महायुतीची जाहीर सभाही पुण्यात घेणार आहे. सुप्रिया सुळे उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार, संजय राऊत आणि काँग्रेसचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top