नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी बांधवांना गुढी पाडव्याच्या खास मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट करत ह्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. गुढी पाडव्याची शुभ पहाट उजाडत असताना, सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. हा सण प्रत्येकाच्या जीवनात अमर्याद आनंद, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो. सर्वांची भावी वाटचाल यशाच्या तेजाने उजळून निघो हीच सदिच्छा!’ यासोबतच अनेक राजकीय मंडळींनीही त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून मराठी बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.