नाशिक- मुंबईहून गोरखपूरकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला भीषण आग लागल्याची घटना नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ घडली. या बोगीतून आगीचे लोळ आणि धुराचे लोट बाहेर पडत होते. त्यामुळे प्रवाशांची पळापळ झाली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ गोदान एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली. आगीच्या घटनेनंतर एक्स्प्रेस थांबवण्यात आली. या आगीची माहिती मिळताच प्रवासी आणि परिसरातील लोक मोठ्या संख्येने जमले होते. पार्सल बोगीतून आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. या आगीमुळे एक्स्प्रेसमधील प्रवासी प्रचंड घाबरले. या पार्सल बोगीतील संपूर्ण जळून खाक झाला. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. काही क्षणात ही आग विझवण्यात आली.