नागपूर – अमरावतीच्या खा. नवनीत राणा आगामी लोकसभा निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढविण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये आज झालेल्या भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय युवा महासंमेलनात नवनीत राणा यांना तरुण खासदार म्हणून भाषण करण्याची संधी देण्यात आली. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या आहेत. आज भाजपाच्या व्यासपीठावर त्यांना भाषण करण्याची संधी दिल्याने त्या भाजपाच्या कमळावर निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे.