मुंबई –
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज टोल वसुलीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते. मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंची आजची भेट रद्द झाली. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेमुळे आजची भेट रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. काल मुख्यमंत्री शिंदेंच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यापूर्वीदेखील राज ठाकरेंनी टोल प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती.