मुंबई- थर्टी फर्स्टच्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत परवानाकृत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल व रेस्तराँ असोसिएशन पश्चिम भारत (हरवी) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. हरवी ही राज्यभरातील हॉटेल व्यावसायिकांची मोठी संघटना असून ७२ वर्षे जुनी आहे. ही संघटना भारतीय हॉटेल व रेस्तरां महासंघाचा भाग आहे. केवळ परवानाधारक हॉटेल व रेस्तरां यांना राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. यासाठीच असोसिएशनने राज्याचे प्रधान सचिव (गृह) राधिक रस्तोगी, पोलिस महासंचालक रजनीश सेठ व मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले. असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी सांगितले की,’ नाताळ व नववर्षाच्या उत्साहाचे स्वागत करण्यासाठी सर्व हॉटेल व्यावसायिक सज्ज आहेत. आम्ही नेहमीच ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. हिच बाब लक्षात घेऊन नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या दिवशी हॉटेल व्यवसाय पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी. आमचे सर्व सदस्य उच्च दर्जाच्या सुरक्षेचे पालन करीत सेवा देतील.’
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |