राहुल गांधींना दिलासा नाही२० एप्रिलला पुढील सुनावणी

सुरत – मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ३ एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी या निकालाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आणि आपल्या शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका केली होती. मात्र या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुरतच्या सत्र न्यायालयाकडून राहूल गांधी यांना सध्या कोणताही दिलासा मिळालेला नाही. याची पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे.