भारतातील घराघरात पोहोचलेल्या हॉकिन्स कुकर कंपनीने गेल्या ६३ वर्षांपासून आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू टिकवून ठेवली आहे. ज्या काळात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केला जायचा. अत्याधुनिक उपकरणांचा वापर करणे भारतीय स्त्रियांना माहितीही नव्हते त्या काळात हॉकिन्सने भारतात प्रेशर कुकर लॉन्च केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही या कंपनीने प्रगती साधली.
एच.डी. वासुदेवा यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी हॉकिन्स कुकर लिमिडेटची कंपनी सुरु केली होती. त्यावेळी इंग्लमधील एल.जी. हॉकिन्सकडून तांत्रिक मदत घेण्यात आली होती. म्हणूनच कदाचित सहदेव यांनी या कंपनीचं नाव हॉकिन्स कुकर असं ठेवलं असावं. गेल्या ६३ वर्षांत या कंपनीने चांगली कामगिरी केली असून भारतातील अनेक घरांत या कंपनीचा कुकर पोहोचलेला आहे. एवढंच नव्हे तर या कंपनीचा व्यवसाय जवळपास ६५ देशांत पोहोचला आहे. सध्या या कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून ठाणे, होशिरापूर आणि जौनपूर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत.
या कंपनीकडून सतत अद्ययावत तांत्रिक बदल होत असल्याने कुकरची मागणी वाढली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये जाहीर झालेल्या तिमाहित या कंपनीचा नेट सेल्स गेल्यावर्षीपेक्षा १६.२२ टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच २६८.५४ कोटींचा नेट सेल्स झाला. मात्र, डिसेंबर २०२१ च्या मुळ नफ्यात गेल्यावर्षीपेक्षा २०.९४ टक्क्यांनी तोटा झाला आहे. २०२१ डिसेंबरच्या तिमाहित कंपनीचा केवळ १९.१५ कोटी मूळ नफा झाला, गेल्यावर्षी हा नफा २४.२२ कोटी होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स घसरत आहेत. २६ फेब्रुवारी रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत ५ हजार २०० रुपये होती.