संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

9 मिनिटांत 20 किलोमीटर
सायरस यांच्या कारचा वेग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – पालघरमध्ये टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात रविवारी मृत्यू झाला. हा अपघात झाला त्यावेळी त्यांच्या कारने अवघ्या 9 मिनिटांमध्ये 20 किलोमीटर अंतर पार केले होते. तसेच रात्री अडीचच्या सुमारास सायरस मिस्त्री यांच्या मृतदेहावर मुंबईच्या जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात मिस्त्रींच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाल्याचे उघड झाले आहे. या अपघातामुळे सायरस मिस्त्रींचा जागीच मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. जेजे रुग्णालय प्रशासनाने सायरस मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर पंडोळे यांचा शवविच्छेदन अहवाल कासा पोलीस स्टेशनला पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोठे खुलासे केले असून या गाडीमधील दोन्ही मृतांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता, असे एका पोलीस अधिकार्‍याने प्राथमिक तपासानंतर सांगितले. या अधिकार्‍याने सांगितले की, कारने अपघात झाला त्यावेळी अवघ्या 9 मिनिटांमध्ये 20 किलोमीटर अंतर पार केले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami