अमरावती- 30 तासांच्या मतमोजणीनंतर आज दुपारी अमरावती पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील यांचा विजय झाला आहे. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटलांना पराभवाची चव चाखायला मिळाली.
या निवडणुकीच्या मतमोजणी काल सकाळीपासून सुरु झाली होती. आज सकाळी अवैध मतांची फेरमोजणी करण्यात आल्यानंतर देखील फारसा फरक न पडल्याने बाद फेरीची मतमोजणी सुरु करण्यात आली. या सर्वाधिक कमी मते पडलेल्या उमेदवारांच्या मिळालेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर बाद फेरीच्या मतमोजणीअखेर धीरज लिंगाडे यांना 46 हजार 344 मते प्राप्त झाली, तर डॉ. रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली. विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा 47 हजार 101 इतका निश्चित करण्यात आला होता. धीरज लिंगाडे हे कोटा पूर्ण करू शकले नाहीत, पण सर्वाधिक मते प्राप्त करून ते विजयी ठरले आहेत.