संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

271 ग्रामपंचायतींसाठी
4 ऑगस्ट रोजी मतदान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम 10 अ पोटकलम (4) मधील अधिकारांचा वापर करत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी 271 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीसाठी 4 ऑगस्ट रोजी मतदान, तर 5 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी तहसिलदार निवडणुकीची नोटीस 5 जुलै 2022 राजी प्रसिध्द करतील. नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करण्यासाठी 12 जुलै 2022 ते 19 जुलै 2022 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ असणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 जुलै 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम मुदत 22 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यर्ंत असणार आहे. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी 22 जुलै 2022 रोजी दुपारी 3 नंतर वेळ असणार आहे. या निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यर्ंत मतदान होणार आहे. तर मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. 271 ग्रामपंचायतींसाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, असेही राज्य निवडणुक आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, नाशिक 40, धुळे 52, जळगाव 24, अहमदनगर 15, पुणे 19, सोलापूर 25, सातारा 10, सांगली 1, औरंगाबाद 16, जालना 28, बीड 13, लातूर 9, उस्मानाबाद 11, परभणी 3, बुलढाणा 5 आदी 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींत निवडणुका होणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami